Shiv Janmotsav : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कंधारच्या अध्यक्षपदी विनोद पाटील तोरणे यांची निवड

कंधार (सचिन मोरे) शासकीय विश्रामगृह कंधार येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा २०२६ ची बैठक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष धनराज पाटील लुंगारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे माजी सचिव विनोद पाटील तोरणे यांची शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह कंधार येथे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. ही बैठक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष धनराज पाटील लुंगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणारा शिवजन्मोत्सव सोहळ्या विषयी विविध विषयावर चर्चा होऊन जन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हा सचिव विनोद पाटील तोरणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व उर्वरित कार्यकारणी निवडीची बैठक लवकरच शासकीय विश्रामगृह कंधार येथे घेण्यात येणार असून उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे.

या बैठकीला धनराज पाटील लुंगारे, नामदेव कुट्टे,बळीराम पाटील पवार, नितीन पाटील कोकाटे, परमेश्वर पाटील जाधव,संदीप पाटील तोंडचिरे, प्रदीप पाटील हुंबाड, अमित पाटील मोरे,विकास पाटील गारोळे, शहाजी पाटील शिंदे,अंकुश पाटील कदम, सौरभ मोरे,संतोष बोरोळे, डी.जी जाधव,त्रिभुवन मोरे, शाहरुख शेख, कैलास पाटील पवळे, विष्णू पाटील जाधव, ज्ञानेश्वर पाटील तेलंग,विकास पाटील लुंगारे यांच्यासह तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button