नांदेडकरियर

Celebrating Journalist’s Day : जि.प.प्रा.शाळा इस्लापूर व शालेय समितीच्या वतीने पत्रकार दिन साजरा -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| इस्लापूर येथील नविन जि.प.प्रा.शाळा सावरकर नगर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी
जेष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड व उपस्थित पत्रकार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकारांचे शालेय समितीच्या वतीने नोटबुक व पेन देऊन सत्कार करण्यात आला.पत्रकार परमेश्वर पेशवे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकले व पत्रकार दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक इर्शाद पांडे यांनी केले.

IMG 20250107 WA0028 Celebrating Journalist's Day : जि.प.प्रा.शाळा इस्लापूर व शालेय समितीच्या वतीने पत्रकार दिन साजरा -NNL

यावेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड,परमेश्वर पेशवे,गौतम कांबळे, प्रमोद जाधव,रावसाहेब कदम, इमरान घोडके, विशाल भालेराव, तसेच शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व पालक जगदीप हनवते, लक्ष्मण जाधव, बालाजी तोंडारे, देवकते,भुरके,फरकाडे, धुमाळ, मुख्याध्यापीका श्रीमती अडबलवार मॅडम शिक्षक इर्शाद पांडे व विद्यार्थी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!