Apeel Belkhode ; देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती

श्री क्षेत्र माहूर l सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात राज्यभर उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या देवाभाऊ फाउंडेशनच्या संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर माहूर तालुक्यातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अपील बेलखोडे यांची देवाभाऊ फाउंडेशनच्या हिंगोली लोकसभा कार्यसमितीत माहूर तालुका सह-समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक श्री. गजाननदादा जोशी यांनी फाउंडेशनच्या केंद्रीय कार्यालयातून अधिकृतरीत्या जाहीर केली. त्याचबरोबर हिंगोली लोकसभा समन्वयकपदी श्री. शैलेश श्यामसुंदर नांदेडकर यांचीही निवड करण्यात आली आहे.

मुख्य समन्वयक जोशी यांनी सांगितले की, “देवाभाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाचे कार्य पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कामात अपील बेलखोडे यांच्यासारख्या सक्रिय कार्यकर्त्यांचा सहभाग फाउंडेशनच्या उद्दिष्टपूर्तीस निश्चितच गती देईल.”

देवाभाऊ फाउंडेशन हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वदेशी, सहकार, बुद्धिमत्ता आणि स्वावलंबन” या तत्त्वांवर आधारित समाजकार्य करीत असून, राज्य संयोजक आशिष घोलप यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयक नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू आहे.

या नियुक्त्यांमुळे हिंगोली लोकसभा क्षेत्रातील संघटनात्मक कार्य अधिक गतिमान होईल, तसेच स्थानिक युवकांमध्ये समाजसेवेची नवी प्रेरणा निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.या  निमित्ताने माहूर तालुक्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी अपील बेलखोडे यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button