युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन लवकरच घेणार…राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही देश पातळीवर समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघ फार कमी वेळात हवेच्या वेगाने संपूर्ण देशात पसरला गेला आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन झाल्यापासून ग्रामीण भागातील व शहरातील निर्भीड पत्रकारांचा पाया उभा करणे हे एकच ध्येय मनात ठेवून श्री गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष यांनी युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली.

पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन करून कुठल्याही क्षेत्रातील त्यांच्या अडीअडचणी व समस्या तसेच पत्रकारांवर होणारे अन्याय अत्याचार,बातमीचे वृत संकलन करत असताना अनेक अडचणींना पत्रकाराना सामोरे जावे लागते. पत्रकारांच्या समस्या सोडविणे व वेळ प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे तसेच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी लढा देणे हीच जिद्द ठेवून यांनी पत्रकारावरील अन्याय अत्याचार कुठेतरी थांबावा यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संपूर्ण देशात संघटन केले .

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून सर्वसामान्य जनतेला न्याय कोणाकडे मिळू शकतो, कोण आपल्याला वेळोवेळी मदत करू शकतो पत्रकार हा जनसामान्यापर्यंत पोहोचून नक्कीच न्याय मिळवून देऊ शकतो असा आत्मविश्वास या देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनात असून पत्रकारांनी देखील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवत असताना आपल्या लिखाणातून ग्रामीण भागातील प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे खरे काम केले असल्याचे मत राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे . यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन लवकरच घेऊ या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील व देशातील पत्रकार यांनी अधिवेशनाला सहभागी व्हावे असेही आव्हान त्यांनी केले.

त्यातच मराठवाड्यासह विदर्भात विखुरलेल्या सर्व पत्रकारांना न्याय मिळवून देण्याची काम युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून केल्या जाईल असे मत यावेळी मराठवाडा विभागीय संघटक परमेश्वर पेशवे यांनी व्यक्त केले.युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर करून अधिवेशनामध्ये निर्भीड पत्रकारांना मानसन्मान देऊन पुरस्कार जाहीर करू व संपूर्ण देशातील पत्रकारांच्या समस्येचे निवारण करू असे ही यावेळी म्हणाले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button