नांदेड

मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL

पाऊस दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर आणि गडावर जागोजागी हजारो बियां टाकण्यात आल्या

नांदेड| मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा व अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी यासाठी धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे घातल्यानंतर नांदेड परिसरात दिवसभर पाऊस पडला असून २३ व्या रत्नेश्वरी पाऊस दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर आणि गडावर जागोजागी हजारो बियां टाकण्यात आल्या. नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये आवाहन केल्यानुसार यात्रेकरूंनी स्वतःच्या आईच्या नावाने एकेक झाड लावले.

Picsart 24 07 01 09 36 32 337 मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL

अमरनाथ यात्री संघ,भाजप महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख,ला. योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

सकाळी ६ वाजता महंत कैलाश महाराज वैष्णव यांच्या हस्ते दिंडीला भगवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.द्वारकादास नखाते, मुकेशभाई पटेल,अमरनाथ शिखरे पाटील,योगेशभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वनिक्षेपक असलेला रथ व ढोल ताशाच्या गजरात यात्रेकरूंनी मार्गक्रमण सुरू केले. श्रीराम मंदिर लातूर फाटा नांदेड येथे पवन गुरुखुदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी किरण व नारायण गवळी,संगीता व डॉ. नारायण भुस्से, आशुतोष मुखडे, सुजाता मुखाडे,माधुरी व सूर्यकांत सुवर्णकार, जयश्री व मधुकर पाष्टे, कविता व अशोक गरुडकर, सविता व राजू बच्चेवार यांच्यासह सर्व यात्रेकरूंचा शाल व पुष्पहाराने सत्कार केला .

Picsart 24 07 01 09 35 55 667 मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL
 

सुभाष देवकते,संजय जाधव,माधव मस्‍कले यांनी सिडको येथील विश्वेश्वर महादेव मंदिरात सर्वांचा सन्मान करून अल्पोहापराचे वाटप केले. विष्णुपुरी दिंडी पोहोचली असता भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्यावतीने प्राचार्य बालाजी गिरगावकर, संतोष कदम जानापुरीकर यांनी सर्वांना अल्पोहार देऊन जंगी स्वागत केले. रस्त्यामध्ये नानकसर गुरुद्वाराचे दर्शन घेऊन अरदास करण्यात आली. रत्नेश्वरी गड चढण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुकाराम गायकर यांनी सर्वांना उसाचा रस पाजल्यामुळे नवीन ऊर्जा मिळाली. गडावर चढत असताना यात्रेकरूंनी आपल्या सोबत आणलेले जांभूळ, सिताफळ, लिंबोळी,कोयी यासह इतर बिया जागोजागी पेरल्या.दररोजचा पायी चालण्याचा सराव असल्यामुळे यात्रेकरूंनी १८ किमी चे अंतर सहजच पूर्ण केले. जयश्री व दिलीप ठाकूर यांच्या हस्ते रत्नेश्वरी मातेची आरती करण्यात आली.

Picsart 24 07 01 09 38 23 663 मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL
 

मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा व अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी यासाठी अरुणा केंद्रे,सुमती व शशिकांत कुलकर्णी, मृदुला व बलभीम पत्की, प्रतिभा व विकास गादेवार यांच्यासह सर्वांनी रत्नेश्वरी मातेला साकडे घातले.अन्नपूर्णा मंदिरात ज्योती व रामेश्वर वाघमारे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मंदिराच्या अध्यक्षा सुषमा गहेरवार, हभप रामराव राऊत महाराज यांच्या हस्ते सर्व यात्रेकरूंचा सन्मान करण्यात आला.दरवर्षी प्रमाणे दानशूर व्यापारी जितेंद्र भयानी यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर मन की बात मध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार दिलीप ठाकूर,सुरेखा व डॉ. उत्तम इंगळे,माया व शिवाजी दिग्रसे,सुजाता व सुधीर आंबेकर यांनी स्वतःच्या आईच्या नावाने एकेक झाड लावले.

Picsart 24 07 01 09 37 50 120 मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL
 

वंदना व केदारमल मालपाणी, सविता व अरुणकुमार काबरा यांच्यातर्फे सर्वांच्या परतीच्या प्रवासासाठी वाहनांची व्यवस्था आली. विशेष म्हणजे पाऊस दिंडी संपल्यानंतर नांदेड परिसरात दिवसभर पाऊस सुरू होता.पाऊस दिंडी यशस्वी करण्यासाठी महेश नळगे, गोपीनाथ वैद्यम,संतोष चेनगे, कालिदास निरणे, संतोष बच्चेवार,बालाजी जाधव, राजेश सुरतवाला, अविनाश भयानी यांनी परिश्रम घेतले.गेल्या २३ वर्षापासून सातत्याने बियाचे रोपण करत असल्यामुळे नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर तसेच गडावर मोठ्या प्रमाणात झाडे लागल्यामुळे दिलीप ठाकूर व अमरनाथ यात्रेकरूंचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!