मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा म्हणून १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे -NNL
नांदेड| मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडावा व अमरनाथ यात्रा यशस्वी व्हावी यासाठी धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या १०६ अमरनाथ यात्रेकरूंनी माता रत्नेश्वरीला साकडे घातल्यानंतर नांदेड परिसरात दिवसभर पाऊस पडला असून २३ व्या रत्नेश्वरी पाऊस दिंडीत नांदेड ते रत्नेश्वरी रस्त्यावर आणि गडावर जागोजागी हजारो बियां टाकण्यात आल्या. नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये आवाहन केल्यानुसार यात्रेकरूंनी स्वतःच्या आईच्या नावाने एकेक झाड लावले.
अमरनाथ यात्री संघ,भाजप महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.खा.अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख,ला. योगेश...
