नांदेडकरियर

Waghala ; 50 वा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड व कब, बुलबुल जिल्हा मेळाव्याचे आश्रम शाळा वाघाळा नांदेड येथे आयोजन

नवीन नांदेड l नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय नांदेड व जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नांदेड यांच्या वतीने जिल्हास्तरीय ५० वा जिल्हा मेळावा दि. 4 ते 7 फेब्रुवारी 25 या कालावधीत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, वाघाळा नांदेड ता. जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

स्काऊटस आणि गाईडस ही निधर्मी, अराजकीय व गणवेषधारी सर्वात मोठी चळवळ आहे. ही चळवळ रान 1907मध्ये इंग्लडमध्ये सुरु झाली असून आजमितीस जगातील 210 देशात सुरु आहे. या चळवळीच्या माध्यमातुन देशाचा भावी नागरीक सुजाण, सुसंस्कत, स्वावलंबी व आत्मनिर्भर घडावा यासाठी ही चळवळ सातत्याने कार्य करीत आहे.

या चळवळीत जगातील चार कोटी पेक्षा जास्त युवक युवती सहभागी असून भारतातील 55 लक्ष तर महाराष्ट्र राज्यात 15 लक्ष सदस्यांचा त्यात समावेश आहे. तसेच नांदेड जिल्हयातील 35 हजार सदस्य आहेत. या चळवळीची मुलतत्वे लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने सन 1972 मध्ये या चळवळीतील अभ्यासक्रमाचा शालेय विषयांतर्गत समावेश केला.

जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हायातुन 16 तालुक्यातून नांदेड तालुक्याला हा मान पंधराव्या वर्षी मिळाला असुन नांदेड तालुक्यातील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक अश्राम शाळा‌ वाघाळा येथे 4 ते 7 फेब्रुवारी 25 या कालावधीत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक अश्राम शाळा‌ वाघाळा नांदेड ता. जि. नांदेड येथे 50 वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात नांदेड जिल्हयातील 2500 हजार विध्यार्थी सहभागी होत आहेत. सहभागी विध्यार्थ्यांसाठी आयोजकां द्वारे निवास व त्या अनुषंगाने लागणा-या भौतिक सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.

या जांबोरीत साहसी व आनंदमयी खेळ,राज्यांतील खादय संस्कती, सांस्कृतिक देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण, समुदाय विकास उपक्रम,संचलन व शिस्त,कॅम्प क्राप्ट, कॅम्प फायर, पायोनियरिंग प्रकल्प, शारीरीक कसरती, लोकनत्य, बॅन्ड पथक, इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.सविता बिरगे, माध्यमिक माधव सलगरे यांनी जास्तित जास्त विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविण्या करीता आवाहन केले आहे.

स्काऊट गाईड मेळाव्यासाठी जिल्हा संघटक जनार्दन ईरले, जिल्हा गाईड संघटक शिवकाशी तांडे, जिल्हा चिटणीस गंगाधर राठोड, मेळावा प्रमुख रवी ढगे,व स्काऊट गाईड प्रशिक्षण आयुक्त भागिरथी बच्चेवार,
आयोजक मुख्याध्यापक भगवानराव इंगेवाड‌ हे परिश्रम घेत आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button