लोहा l भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त माजी सैनिक एस एन शिंगारपुतळे यांचे किडनीच्या आजाराने उपचारा दरम्यान रविवारी (३ फेब्रुवारी)रोजी रात्री साडे आठ वाजता निधन झाले .मृत्यूसमयी त्याचे वय ७० वर्ष होते.लोह्यातील स्मशानभूमीत आज सोमवारी दुपारी दोन वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संतराम नामदेव शिनगारपुतळे एक प्रखर देशभक्त होते तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक होते .भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्या नंतर भारतीय बौद्ध महासभेसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या धम्म कार्याला त्यांनी वाहून घेतले.समता सैनिक दलात असिस्टंट चीफ इन कमांडर होते तर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लोहा चे आठ वर्षे ते अध्यक्ष राहिले .बुद्ध जयंती, भीम जयंती तसेच श्रामनेर शिबीर त्यांनी घेतले .

किडनी आजारामुळे त्याचे रविवारी (३ फेब्रुवारी) रात्री साडे आठ वाजता उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आज सोमवारी ।( 3 फेब्रु) दुपारी दोन वाजता लोह्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे नातू असा परिवार आहे .भारतीय बौद्ध महासभा व विविध संघटनेच्या वतीने त्याच्या दुःखद निधना बद्दल शोक व्यक्त केला आहे पोलीस जमादार विशाल , शिनगाररपुतळे, विक्की शिंगारपुतळे यांचे तेवडील होते
