Waghala ; 50 वा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड व कब, बुलबुल जिल्हा मेळाव्याचे आश्रम शाळा वाघाळा नांदेड येथे आयोजन
नवीन नांदेड l नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय नांदेड व जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नांदेड यांच्या वतीने जिल्हास्तरीय ५० वा जिल्हा मेळावा दि. 4 ते 7 फेब्रुवारी 25 या कालावधीत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, वाघाळा नांदेड ता. जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
स्काऊटस आणि गाईडस ही निधर्मी, अराजकीय व गणवेषधारी सर्वात मोठी चळवळ आहे. ही चळवळ रान 1907मध्ये इंग्लडमध्ये सुरु झाली असून आजमितीस जगातील 210 देशात सुरु आहे. या चळवळीच्या माध्यमातुन देशाचा भावी नागरीक सुजाण, सुसंस्कत, स्वावलंबी व आत्मनिर्भर घडावा यासाठी ही चळवळ सातत्याने कार्य करीत आहे.
या चळवळीत जगातील चार कोटी पेक्षा जास्त युवक युवती सहभागी असून भारतातील 55 लक्ष तर महाराष्ट्र राज्यात 15 लक्ष सदस्यांचा त्यात समावेश आहे. तसेच नांदेड जिल्हयातील 35 हजार सदस्य आहेत. या चळवळीची मुलतत्वे लक्षा...
