Kalvat Phula ; मांडवी, गणेशपुर, कोठारी (सिं), जमुनानगर मार्गावरील कलवट फुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

किनवट, परमेश्वर पेशवे l सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.2 किनवट अंतर्गत जि.प्र. मा.क्र. 4 मांडवी ते गणेशपुर, कोठारी सिंद., जमुना नगर या मार्गावरील शासकीय कंत्राटदाराने टक्केवारी घेऊन बोगस काम करणाऱ्या खाजगी गुत्तेदाराला कलवट पुलाचे काम दिल्याने मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित बांधकाम विभागाचे अभियंता यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

हल्ली विकास कामाच्या नावावर शासकीय कंत्राटदाराचे नावे कामे घेऊन ज्यांना संबंधित कुठल्याही कामाचा अनुभव नसलेले बोगस गुत्तेदारांनी धुमाकूळ घातला असून अशा बोगस गुत्तेदाराकडून विकासाच्या नावावर विविध विकास कामाचे कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहे.

प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक चार कोठारी सिंद.या मार्गावर पाच कलवट फुलाचे काम संबंधित शासकीय गुत्तेदाराने एका खाजगी व्यक्तीला टक्केवारी घेऊन विकले आहे. या कलवट पुलाचे त्या बोगस गुत्तेदाराने जास्तीत जास्त पैसे वाचविण्याच्या नादात निकृष्ट दर्जाचे केले केले आहे.

किनवट तालुक्यात रेतीचा एकही घाट हर्रास झालेला नसताना या कलवट पुलाच्या सिमेंट काँक्रेट कामासाठी संबंधित गुत्तेदाराने चक्क नाल्याची माती मिश्रित रितीचाच वापर केला यात तीळ मात्र शंका नसून या रस्त्याने जाणाऱ्या येणारा कोणताही नागरिक हे सांगू शकेल तसेच या कलवट पुलाच्या सिमेंट काँक्रेट पाईप बसविण्यातही अनियमितता करत ओबडधोबड बसविल्या गेली.

काही ठिकाणी तर तुटलेल्या पाईपही लावण्यात आला असे प्रत्यक्षदर्शी दिसून येत असून तेव्हा या कलवट फुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी. आणि दर्जेदार कामे कशी करता येईल याकडे लोकप्रतिनिधीनेही लक्ष देणे गरजेचे आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button