Police station Umri arrested : पोलीस स्टेशन उमरी यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस घेतले ताब्यात -NNL

नांदेड| अबिनाश कुमार सर, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अंमली पदार्थाची विक्री करणारे व्यक्तीची माहिती काढुन, त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून पोलीस स्टेशन उमरी यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीची गुप्त माहिती घेऊन त्यास ताब्यात घेतले.

त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत मा. श्री खंडेराव धरणे सर, अपर पोलीस अधीक्षक, भोकर व मा.श्री प्रशांत संपते सर उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक श्री अंकुश माने यांना दिनांक 06.09.2024 रोजी माहिती मिळाली की, उमरी शहरात एक इसम आमंली पदार्थ गांजाची विक्री करीत आहे. त्यावरुन आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांनी आम्हाला NDPS अॅक्ट अन्वये कार्यावाही करण्या करीता अधिकार पत्र दिल्याने आम्ही शासकीय पंच, वजन मापन करणारे, कॅमेरामन व पो.स्टे.चे स्टाफसह रापतवारनगर उमरी येथील एका घरात छापा मारला असता तेथे एक इसम नामे लक्ष्मण ऊर्फ बबलु नरसिंग जैस्वाल वय 35 वर्ष रा. रापतवारनगर उमरी हा मिळुन आल्याने त्यास छाप्याचा उद्देश कळवुन पंचासमक्ष घराची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात लोकांना अवैध विक्री करण्याचे उद्देशाने बाळगलेला 2 किलो 128 ग्रॅम गांजा किंमती 80,512/- रुचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन उमरी येथे गु.र.नं.311/2024 कलम 8(c), 20(b)(ii) (b) एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल हा कोठुन आणला या बाबत पुढील तपास चालु आहे.

सदरची कामगीरी मा.श्री. अबिनाश कुमार सर, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री. खंडेराव धरणे सर, अपर पोलीस अधीक्ष, भोकर, मा. श्री सुरज गुरव सर, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री प्रशांत संपते सर उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद यांचे मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरिक्षक अंकुश माने, प्रभारी अधिकारी पोलीस ठाणे उमरी , पोलीस उप निरिक्षक मुक्तीराम चेवले, सचिन आरमळ, सपोउपनि माणिक कदम, पोलीस हेड कॉस्टेबल रामन गेडाम, पोलीस अंमलदार सिध्दार्थ केळकर, अरविंद हैबतकर, साहेबराव हौसरे, नितिश बिस्मीले, माधव पवार, दत्तात्रय गुरुपवाड महिला पोलीस अंमलदार वंदना पांचाळ, होमगार्ड अविनाश राठोड, होमगार्ड-अंकुश राठोड, होमगार्ड शेळके, होमगार्ड- लोहगावे यांनी पार पाडली वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button