Police station Umri arrested : पोलीस स्टेशन उमरी यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीस घेतले ताब्यात -NNL
नांदेड| अबिनाश कुमार सर, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अंमली पदार्थाची विक्री करणारे व्यक्तीची माहिती काढुन, त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून पोलीस स्टेशन उमरी यांनी गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीची गुप्त माहिती घेऊन त्यास ताब्यात घेतले.
त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत मा. श्री खंडेराव धरणे सर, अपर पोलीस अधीक्षक, भोकर व मा.श्री प्रशांत संपते सर उपविभागीय पोलीस अधिकारी, धर्माबाद यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक श्री अंकुश माने यांना दिनांक 06.09.2024 रोजी माहिती मिळाली की, उमरी शहरात एक इसम आमंली पदार्थ गांजाची विक्री करीत आहे. त्यावरुन आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना देवून वरिष्ठांनी आम्हाला NDPS अॅक्ट अन्वये कार्यावाही करण्या करीता अधिकार पत्र दिल्याने आम्ही शासकीय पंच, वजन मापन करणारे, कॅमेरामन व पो.स्टे.चे स्...
