नवीन नांदेड l आषाढी महोत्सव निमित्ताने स्वर अलंकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला,अभंग व भक्ती गिताचा कार्यक्रम आयोजन रविवार 6 जुलै रोजी सकाळी 7 वाजता विठ्ठल रूक्मिणी मंदिर क्रांती चौक सिडको येथे मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.


दरवर्षी प्रमाणे याही अकराव्या वर्षी आषाढी पहाट सुरेल अभंग व भक्ती गिताचा कार्यक्रम आयोजित केले असून ऊध्दाटक नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, प्रमुख पाहुणे माजी आमदार मोहनराव हंबर्डे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे,युवा शक्ती मित्र मंडळ संस्थापक संजय पाटील घोगरे,व्हाईस प्रेसिडेंट डॉ.नरेश रायेवार यांच्या सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात अभंग,भजन, भक्ती गिते सादरीकरण करण्यात येणार आहेत,या कार्यक्रमास सौजन्य मंदाकिनी पाठक सेवानिवृत्त तहसीलदार यांनी सहकार्य केले आहे,तर विशेष सहकार्य डि.गा.पाटील ,सराफा असोसिएशन अध्यक्ष गिरीधर मैड यांनी केले असून हभप चंद्रशेखर कहाळेकर, या सोहळ्याचे निवेदक म्हणून संजय देशपांडे, संयोजक अर्जृन गुंडाळे, प्रसिद्ध गायक महैश जैन,संगित संयोजक संतोष देशमुख, प्रसिध्द गायिका रागेश्री जोशी, अंजली भिसे,निवेदीता जोशी, यांच्या सह अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.

या आयोजित अवघा रंग एक झाला या भक्ती गिताचा कार्यक्रमाला भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती सिडकोचे जिंदमवार व महेश लुंगारे यांनी केले आहे.
