नांदेड| नाईकनगर नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याने विविध गुन्ह्यातील जप्त केलेली २५ दुचाकी वाहने बेवारस अवस्थेत असून या वाहनांच्या मालकांनी कागदपत्रे दाखऊन व ओळख पटवून ही वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.


विविध गुन्ह्यात व बेवारस अवस्थेत सापडलेल्या २५ दुचाकी विमानतळ पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या असून त्यांची सविस्तर यादी पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आली आहे. या यादीत गाडीची कंपनी, गाडीचा क्रमांक, इंजिन क्रमांक, चेसीस क्रमांक आदी सविस्तर माहिती आहे.

या गाड्या ओळख पटऊन घेऊन जाण्याचे आवाहन यापूर्वीही करण्यात आले होते पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही. गाडीचे कुणी मालक येत नसतील तर लिलावाद्वारे विकून येणारी रक्कम शाशनाच्या तिजोरीत जमा करण्याचे आदेश तहसीलदार नांदेड यांनी दिल्याचे पोलीस निरीक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

लिलावाच्या अगोदर वाहनाच्या मूळ मालकांनी गाडीची कागदपत्रे दाखऊन व ओळख पटवून तात्काळ आपली वाहने घेऊन जावित असे आवाहन विमानतळ पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
