Meeting of Women Vigilance : देगलूर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक संपन्न

देगलूर, गंगाधर मठवाले| येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली. उपस्थित महिला सदस्यांना व बालकाच्या सुरक्षाविषयक कायद्यातील तरतुदीबाबत माहिती देण्यात आले. तसेच वॄक्षारोपन व आगामी काळातील सण उत्सव साजरा करीत असताना महिला दक्षता समिती याची कर्तव्य काय असते.

याबद्दल सविस्तर माहिती दिली महिला व बालकांना समाजात वावरताना कोणकोणत्या समस्या अडचणी येतात याबाबत काय. उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत अवगत करण्यात आले. महिला आणि मुली याना शाळेत काॅलेजात कामावर येता जाताना इतर ठिकाणी येणाऱ्या अडचणी तसेच आदिवासी भागातील लहान मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचार संदर्भात पोलीस ठाणे देगलूर कडून समुपदेशन करण्यात येणार असून, त्यामध्ये महिला दक्षता समिती सदस्यांची भुमिका काय असते.

त्याबाबत अवगत करण्यात आले देगलूर पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी अंमलदार तसेच दामिनी पथक पोलीस दीदी पोलीस काका याचे सपरक करमाक देण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशन देगलूर महिला दक्षता समिती नावाने व्हाट्स अप ग्रुप तयार करण्यात आलेले आहे. असे पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी सांगितले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button