नांदेडमहाराष्ट्र

Police Inspector Amol Bhagat | वाहनधारक व हातगाडेवाल्याने शिस्तीचे पालन करावे – पोलीस निरीक्षक अमोल भगत – NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| पावसाळ्याचे दिवस आणि आगामी काळातील सण उत्सवाची रेलचेल लक्षात घेता शहरातील वाहनधारकांनी व हातगाडे वाल्यानी श्री परमेश्वर मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यावर कुठेही वाहने अथवा आपले स्टोल लावून अडथळा निर्माण करू नये. असे आढळून आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल यासाठी सर्वानी शिस्तीचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले.

ते आषाढी एकादशी निमित्ताने बुधवार दि.१७ रोजी श्री परमेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी होणारी महिलांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आले असता बोलत होते. दाखल होताच त्यांनी प्रथमतः येथील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुखसमृध्दीची कामना केली. यावेळी मंदिर समिती व सामाजिक कार्यकर्ते पंडित ढोणे यांच्या वतीने पुष्पहार व श्रीची प्रतिमा भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हिमायतनगर शहराची माहिती घेतली, लोक शांत व संयमी आहेत, पण काहीजण शिस्तीचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर मंदिरे व धार्मिक स्थळे आहेत, अश्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना अडथळा होणार नाही याची वाहनधारका बरोबर हातगाडी वाल्यानी देखील खबरदारी घेणे महत्वाचे आहे. आज भेट दिल्यावर हा सर्व प्रकार दिसून आल्याने तातडीने मंदिरासमोरील हातगाडी हटवून येथे लावण्यात येणाऱ्या वाहनांना शिस्त लावली आहे. संबंधितांनी या शिस्तीचे पालन दररोज कारणे अनिवार्य आहे. म्हणून दोन कर्मचारी तैनात करण्यात आले असून, मंदिर समितीने देखील आपल्या कर्मचाऱ्यां मार्फत वाहतुकीला शिस्त लावणे आणि मंदिरासमोर अडचण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

तसेच रस्त्यावर कुठेही छोटे दुकाने लागणार नाही याची काळजी घेऊन त्यांना सुलभ अशी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या महिला पुरुष भाविक भक्ताना अडथळा येणार नाही. जर कुणी शिस्तीचे पालन न करता अनादर करीत असले तर आम्हाला आमच्या पद्दाथीने कार्यवाही करावी लागेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंदिर कमिटीचे संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, उदय देशपांडे, मारोती हेंद्रे, श्याम ठाकूर, पंडित ढोणे, विजय दळवी, अनिल सूर्यवशी,  लिपिक बाबुराव भोयर गुरुजी, यांच्यासह बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस कर्मचारी व भाविक भक्त उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button