Police Inspector Amol Bhagat | वाहनधारक व हातगाडेवाल्याने शिस्तीचे पालन करावे – पोलीस निरीक्षक अमोल भगत – NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| पावसाळ्याचे दिवस आणि आगामी काळातील सण उत्सवाची रेलचेल लक्षात घेता शहरातील वाहनधारकांनी व हातगाडे वाल्यानी श्री परमेश्वर मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यावर कुठेही वाहने अथवा आपले स्टोल लावून अडथळा निर्माण करू नये. असे आढळून आल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल यासाठी सर्वानी शिस्तीचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले.
ते आषाढी एकादशी निमित्ताने बुधवार दि.१७ रोजी श्री परमेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी होणारी महिलांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आले असता बोलत होते. दाखल होताच त्यांनी प्रथमतः येथील श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुखसमृध्दीची कामना केली. यावेळी मंदिर समिती व सामाजिक कार्यकर्ते पंडित ढोणे यांच्या वतीने पुष्पहार व श्रीची प्रतिमा भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, हिमा...
