कृषीनांदेड

NCP protests ; राष्ट्रवादीचे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी निदर्शने करत आंदोलन

नायगाव l नायगाव तालुक्यामध्ये दि.28 व 29 ऑगस्ट रोजी ढगफुटी झाल्यामुळे शेतकरी, नागरिक, महिला, व्यापारी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. झालेल्या नुकसानाची सरकारकडून योग्य ती मदत तालुक्यातील नागरिकांना मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नायगाव तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय नायगाव समोर विविध मागण्यांचे घोषणा देत निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात पुढील मागण्या करण्यात नदी नाल्याकडच्या शेतकऱ्यांची वेगळे पंचनामे करून त्यांना विशेष पॅकेज द्वारे हेक्टरी एक लाख रुपयाची मदत करावी.

दि.1जानेवारी 2024 रोजीच्या जीआर अनुसार तीन हेक्टर मर्यादेपर्यंत हेक्टरी किमान 13,600 ते कमाल 40,800 सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.गत हंगाम 2024 पीक विम्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी. शेतकऱ्याची 100 टक्के कर्जमुक्ती करण्यात यावी ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक करावी व स्थानिक मागण्या करण्यात आल्या.

IMG 20250905 WA0114 NCP protests ; राष्ट्रवादीचे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी निदर्शने करत आंदोलन

मागण्यांचे निवेदन तहसीलदार गायकवाड मॅडम यांनी स्वतः येऊन आंदोलनकर्त्याकडून स्वीकारले.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नायगांव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे, तालुका सरचिटणीस किरण वाघमारे,तालुका उपाध्यक्ष बालाजी कदम कुंटूरकर, शहराध्यक्ष संजय पाटील चव्हाण आदींनी सामूहिक पद्धतीने केले.

या आंदोलनात सुजलेगांवचे सरपंच दत्ता आईलवार, कहाळाचे माजी सरपंच विजय पा.कारताळे,संजय नेरलेवाड, माजी सरपंच बालाजी धुमाळ, व्यंकट गोपुलवाड,नारायण पांचाळ,प्रकाश सोनलकर,संदेश वाघमारे,देविदास वडजे, रावसाहेब वाघमारे,श्रीराम वडजे,धिरज बोयाळ,गजानन विभूते आदींसह तालुक्यातील शेतकरी व अतिवृष्टीग्रस्तांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला.

नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आम्ही केलेल्या मागण्या सरकारने जर तात्काळ मान्य नाही केल्या तर तालुक्यामध्ये जनजागृती करून मोठे जन आंदोलन पुकारण्यात येईल.

पांडुरंग शिंदे मांजरमकर
तालुकाध्यक्ष, नायगाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!