
नवीन नांदेड| नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचे स्वागत व अभिनंदन राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण तालुक्यातील पोलीस पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे केले.


नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची नियुक्ती झाल्यानंतर नांदेड दक्षिण तालुक्यातील पोलीस पाटील यांनी राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेऊन स्वागत व अभिनंदन केले. यावेळी भायेगाव येथील महिला पोलीस पाटील सुमनबाई खोसडे,राहेगाव जयश्री पाटील इंगळे,श्रद्धा खटके गोपाळ चावडी, आशा अरसुळे काकांडी ,लवकुश अवनुरे वसरणी, प्रविण हंबर्डे विष्णुपूरी, भास्कर बुध्देवार बळी रामपुर, बाळु वाघमारे कांकाडी, कृष्णा पगडे धनगरवाडी, पांडुरंग हंबर्डे गुडेगांव यांच्या सह विजयकुमार खटके, संजय पाटील इंगळे, खोसडे, यांच्यी उपस्थिती होती. यावेळी पोलीस पाटील यांनी परिचय देऊन विविध विषयावर चर्चा केली.




