किनवट, परमेश्वर पेशवे। तालुक्यातील नंदगाव येथील जि. प. प्राथमिक हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शा.व्य.समिती अध्यक्ष गिरधारी पवार यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच देविदास मोहन जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ सातपुते, सदस्य लखन आडे, विजय आडे उपस्थित होते. मुख्याध्यापक नलाबले यांनी सर्वांचे स्वागत केले. तद्नंतर शाळेतील शिक्षक विजय काळे यांनी जयंतीनिमित्त प्रास्तविकपर विचार मांडले.

या प्रसंगी गीतांजली चव्हाण, रिंकू आडे, अशिका जाधव, संजीवनी चव्हाण, सोनू जाधव, रोशनी पवार, श्रावणी पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थीत मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मु. अ. लक्ष्मण नलाबाले, स.शि.प्रविण अंबालकर, स. शि. विजय काळे, व स.शि. कु. रोहिणी घुमे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावातील पुरुष व महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
