
नांदेड| जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात दि. 11 ते 18 जुलै दरम्यान जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात लोकसंख्या वाढीचे परिणाम, कुटुंब नियोजनाचे फायदे, सुरक्षित मातृत्व व बालमृत्यू प्रतिबंध यासंबंधी जनजागृती पर उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी दिली आहे .


या सप्ताहात लोकसंख्या वाढीचे आरोग्यावर व सामाजिक विकासावर होणारे परिणाम लक्षात घेता नागरिकांमध्ये कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.यावर्षी जागतिक लोकसंख्या दिनकरिता नियोजित पालकत्वासाठी आरोग्यदायी वेळ आणि गर्भधारणेतील अंतर ‘ असी थीम असून,” आई होण्यासाठी योग्य वय तेव्हा, शरीर व मनाची तयारी जेव्हा ” असे घोषवाक्य आहे.

या सप्ताहात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये कुटुंब नियोजन साधनांची माहिती, समुपदेशन शिबिर,पोस्टर प्रदर्शन, फेरी,गाव पातळीवरील चर्चासत्र आणि सोशल मीडिया जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. तसेच कुटुंब नियोजन साधने, मातृत्व, किशोरवयीन आरोग्य आणि संतुलित लोकसंख्येचे फायदे यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सलमा हिरानी यांनी सांगितले.


माझे कुटुंब माझी जबाबदारी
अनियंत्रित लोकसंख्या वाढ ही समाजाच्या सर्वांगीण विकासात अडथळा ठरणारी बाबा आहे .त्यामुळे गर्भनिरोधक साधनांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे,प्रत्येक कुटुंबाने कुटुंब नियोजनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता कुटुंब नियोजन काळाची गरज आहे यासाठी पुरुषांनी अधिक पुढाकार घेणे आवश्यक आहे असे डॉ. संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी सांगितले.



