नांदेडलाइफस्टाइल

Mahur Accident News ; माहूर तालुक्यातील मोटर सायकल अपघातात दोघांचा मुत्यु

श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर। तालुक्यातील पानोळा येथील दोघे मेहुणे हे विदर्भातील पांगरी येथे दर्शनासाठी गेले होते दर्शन आटोपुन ते त्यांच्या दुचाकी क्रं.एम एच २९ एफ १२४२ ने घराकडे जात असताना असोली ते उमरा फाट्यादरम्यान त्यांच्या दुचाकी ला अज्ञात वाहनाने उडविल्याने अक्षरशा त्या दोघा पैकी एकाचे डोके तर एकाचा एक अडंग चेंदामेंदा झालेल्याची घटना दि ३ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली आहे.

पानोळा येथील दोघे मेहुणे हे अर्णी (जि,यवतमाळ) तालुक्यातील पांगरी येथील महादेव मंदीर येथे दर्शनासाठी गेले होते दर्शन आटोपुन प्रकाश प्रसराम जाधव वय ५२ व भारत धनसिंग राठोड वय ५५ हे वडसा मार्गे पानोळा त्यांच्या घराकडे जात असताना रात्री अंदाजे १० वाजताच्या सुमारास उमरा ते आसोली फाटा दरम्यान त्यांच्या दुचाकीस अज्ञात वहानाने उडविण्याची घटना घडल्याची माहिती मिळताच त्यांना रुग्णवाहिकेतून माहुर येथिल ग्रामीण रुग्णालय दाखल केले असता तेथे डॉ.अक्षय सांगळे यांनी दोघांनाही मयत घोषित केले.

अपघात एवढा भिषण होता की मयत प्रकाश प्रसराम जाधव यांचे डोके धडावेगळे तर दुसरे मयत भारत धनसिंग राठोड यांचे एक अंडग चेंदामेंदा मैदा झाल्याने अवस्थेत घटनास्थळी पडुन होते घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलिस ठाण्याचे फौजदार रमेश जाधवर यांनी घटनास्थळी धाव घेतली

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button