१० व्या योग प्रात्यक्षिक शिबिरात ४८ शिबिरार्थींनी सहभाग घेऊन योग व प्राणायामचे धडे गिरविले – NNL

नांदेड| जागतिक योग दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आयोजित केलेल्या १० व्या योग प्रात्यक्षिक शिबिरात ४८ शिबिरार्थींनी सहभाग घेऊन योग शिक्षिका मायादीदी अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली योग व प्राणायामचे धडे गिरविले.


भाजपा महानगर नांदेड,अमरनाथ यात्री संघ, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या वतीने सतत अकराव्या वर्षी सिद्धेश्वर मंदिर गोवर्धन घाट नांदेड येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुभाष देवकते यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून नीता दागडिया, संध्या छापरवाल, माजी नगरसेविका जयश्री ठाकूर ह्या उपस्थित होत्या. सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून योग दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

आर्ट ऑफ लिव्हींग च्या मायादीदी अत्रे, प्रकाश उंटवाले, सचिन भायेकर, वंदना हुरणे, केशव वडोदकर, सुदर्शन देशपांडे या योग शिक्षकांचा सन्मान कविता गरुडकर, राजू बच्चेवार,केदार मालपाणी, डॉ .द्वारकादास नखाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माया दीदी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत योगामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होतो हे आपल्या भाषणातून अनेक संदर्भ देऊन स्पष्ट केले.डॉ.शिवाजी डिग्रसे, गणेश गुरूपवार, भारत गादेवार, अशोक गरुडकर, नागनाथ देशपांडे, व्यंकट वायगावकर यांनी ताडासन, अर्ध मच्छिंद्रासन, भद्रासन, नौकासन, गोमुखासन यासारखे आसन पहिल्यांदाच करत असताना देखील आपले कौशल्य दाखविल्यामुळे माया दीदींनी त्यांचे अभिनंदन केले.


सूक्ष्म व्यायाम प्रकारात समाविष्ट असणारे उभे राहून करावयाची आसने, मानेचे रोटेशन, खांदे अनब्लॉक करणे आदीचा सराव करताना जयलक्ष्मी गादेवार, मृदुला देशपांडे, सुचित्रा वायगावकर, वैशाली नखाते, वंदना मालपाणी, अलका पाटील, सविता बच्चेवार यांनी आपले कौशल्य दाखवले. अमरनाथ शिखरे पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. शिबिरात सामील झालेल्या सर्वांची चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. योग शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवा लोट, संतोष भारती, राजेशसिंह ठाकूर, कपिल यादव, शिवचरण लोट यांनी परिश्रम घेतले. सतत १० व्या वर्षी दिलीप ठाकूर यांनी योग शिबिरचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल योगप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


रविवार दि.२३ जून रोजी सकाळी ६ वाजता राम सेतू पूल, गोवर्धन घाट, नांदेड येथे २३ व्या चालण्याच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून दहा गटातील विजेत्यांना कच्छवेज गुरुकुल नवा कौठा यांच्यातर्फे मोबाईल देण्यात येणार आहे. टेन्ट,मंगल कार्यालय असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह परदेशी यांच्यातर्फे प्रत्येक गटातील तीन यशस्वी स्पर्धकांना आकर्षक स्मृती चिन्ह देण्यात येणार आहेत. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट देण्यात येणार आहेत. प्रवेश निशुल्क असलेल्या या स्पर्धेमध्ये नांदेड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन टी-शर्ट व प्रमाणपत्र मिळवावे असे आवाहन दिलीप ठाकूर यांनी केले आहे.



