Mahur Ncp : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहूर तालुका कार्यकर्णी जाहीर…!

माहूर l आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)तर्फे संघटनात्मक बांधणीस गती देण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने विजय राठोड यांची तालुकाध्यक्ष तर सईद अली यांची माहूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माहूर तालुक कार्यकारिणीचा नुकताच विस्तार करण्यात आला  असून यामध्ये विजय राठोड यांची माहूर तालुकाध्यक्ष पदी तर सईद अली यांची शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.जिल्ह्याचे नेते प्रताप पाटील चिखलीकर व ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर व किनवट माहूर विधानसभा प्रमुख वैजनाथ करपुडे पाटील यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून माहूर तालुका कार्यकरणीचा प्रश्न प्रलंबित पडला होता त्यानिमित्ताने या नियुक्त्या करण्यात आल्या. कार्यकर्णी निवड मुळे यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण असून आगामी निवडणुकांमध्ये पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button