
पंढरपूर/हिमायतनगर, परमेश्वर गोपतवाड| आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह ईतर राज्यातुन भाविकांची अलोट गर्दी होऊन आजपर्यंतच्या ऊपस्थीतीचा रेकार्ड मोडल्याचे चित्र ६ जुलै रोजी दिसुन आले. प्रशासनासह पोलिस, रेल्वे पोलिस अलर्ट राहिल्यामुळे स्वच्छतेसह भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन दर्शन घेतले. (Police and administration on alert in Pandharpur on Ashadhi Ekadashi, devotees break the record for the number of people on alert) चरणस्पर्श दर्शनासाठी तब्बल २४ तास वेळ लागला तर मुख दर्शनासाठी जवळपास सहा तास वेळ लागला.


रांगेत मध्ये कोणी घुसु नये म्हणून सुरक्षक जाळ्यात वाढ करण्यात आली होती. यावेळी चंद्रभागेच्या तीरावर घाण होणार नाही या बाबींची प्रकर्षाने प्रशासनाने काळजी घेतली होती. या भागात देखील भाविकांना मनमोकळेपणाने चंद्रभागेत जाता याव म्हणून सदैव पोलीसांचा फौजफाटा सारखा फिरत होते. पंढरपूर शहरांसह मंदिर परिसरात, चंद्रभागेच्या परीसरात स्वच्छतेसाठी प्रकर्षाने काळजी घेतल्याचे दिसून आले.

रेल्वे स्टेशनवर भाविक जातांना रेल्वे आल्यावर रिझर्व्हेशन डब्बे कुठे कुठे आहेत हे सांगत असतानाच भाविक सुरक्षित कसे जातील. या बाबींची खबरदारी रेल्वे पोलीसांनी घेतल्याचे दिसून आले. पायवारी रस्त्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाविकांना थांबण्यासाठी अनेक ठिकाणी तंबु उभारण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे सदर तबुत थांबलेल्या शेकडो भाविकांसाठी शौचालयासह फराळ, चहा, जेवणापासुन झोपण्यासाठी गाद्याची निटनेटिका व्यवस्था करण्याची ही पहिलीच वेळ होती. उभारलेल्या प्रत्येक तंबु मध्ये टि व्हि लावण्यात आले होते. यावेळी आषाढीच्या दिवशी २५ लाखांच्यावर भाविक पंढरपुरात आल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.


सातारकरांच्या फंडात भाविकांच्या संख्येत वाढ..!
वै बाबामहाराज सातारकर यांच्या नंतर मधल्या काळापेक्षा यावर्षी सातारकर यांच्या फडात भाविकांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे.ह भ प भगवतीताई महाराज यांच्या प्रवचन किर्तनात आणि,ह भ प चिन्मय महाराज यांच्या प्रवचन,किर्तनात देखील अमुलाग्र बदल झाल्यामुळे भाविकांना क्षणोक्षणी वै. बाबामहाराज सातारकर यांची आठवण होऊ लागली. अनेक संतांच्या फंडात देखील भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

पंढरपूर -आदिलाबाद स्पेशल रेल्वेच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष
रेल्वे प्रशासनाचे अलिकडच्या काळात आदिलाबाद- पंढरपूर, आणि पंढरपूर आदिलाबाद स्पेशल रेल्वे सुरू केल्यामुळे भाविकांची गैरसोय दूर झाली आहे. सदर रेल्वे आदिलाबाद येताना हिमायतनगर येथे पाऊन तास उशिरा आली. परळी येथे दिड तास थांबली तर लातुरफाटा येथे तब्बल दोन तास थांबल्यामुळे पंढरपूरला रात्री १२ वाजता पोहचण्याची वेळ असताना तब्बल सकाळी तिन वाजता पोहोचली. परत ६ जुन रोजी परतीच्या प्रवासात रात्री ११ वाजता निघणारी रेल्वे प्रत्यक्षात १२.३० सुटुन पुन्हा लातुरफाटा, परळी वैजनाथ येथे एक एक तास थांबल्यामुळे परतीच्या प्रवासात देखील तिन तास उशिरा आली. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्पेशल रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते. पुढील वर्षी वेळापत्रकाचे बंधन ठेवून यावर्षीच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या मार्गावर दोन रेल्वे सोडाव्यात अशी मागणी भाविकातुन होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची पुजा करुन पहिल्या भाविकांचे दर्शन घेतले. ऊपमुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक आमदार औताडे यांच्या सोबत पंढरपुरात दुचाकी वर फेरफटका मारत चंद्रभागा नदी सह ठिक ठिकाणी भेटी दिल्याचे पाहावयास मिळाले. जलसधारण मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीसांनी ऊभे केलेल्या ऊंच बॅरेकट मध्ये तब्बल दोन तास ऊभे राहून हातात माईक घेऊन भाविकांना शांततेचे आवाहन करताना लाखो भाविकांनी पाहिले.



