नांदेडउमरखेडहिंगोली

उमरखेड येथील नांदेड व हिंगोली खासदारांचा विठ्ठल बागेत सत्कार ! -NNL

उमरखेड,अरविंद ओझलवार। काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी त्यांच्या विठ्ठल बाग निवासस्थानी नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण व हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा स्नेह मिलन सोहळा आयोजित केला होता .

याप्रसंगी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी बोलताना प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले की ,हा सोहळा आयोजित करण्याचे कारण म्हणजे दिल्ली दरबारी अतिशय जवळचे नातेवाईक असलेले दोन खासदार झाल्याने त्यांचा फायदा उमरखेड विधानसभेतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे हा उद्देश ठेवून विठ्ठल बागेत त्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे .

यावेळी बोलतांना नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी मी जरी नांदेडचा खासदार असलो तरी उमरखेड विधानसभेचा विकास करण्यासाठी नेहमी आमच्या महाविकास आघाडीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना प्रत्येक क्षणी मदत करणार असल्याची ग्वाही दिली.

नागेश पाटील अष्टीकर यांनी सांगितले की, उमरखेड विधानसभेतून भरघोस मतांनी मला आघाडी मिळाली त्यामुळे उमरखेडवर माझे विशेष लक्ष राहील यापुढे प्रकाश पाटील देवसरकर यांच्या माध्यमातून उमरखेड तालुक्याचा विकास करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

यावेळी माजी आमदार विजयराव खडसे , माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कृष्णा पाटील देवसरकर, बाबुराव कदम , भीमराव पाटील , माजी सभापती प्रज्ञानंद खडसे ,युवराज पाटील देवसरकर, शाहुराज पाटील देवसरकर, निकिताताई प्रकाश पाटील देवसरकर , गजानन सुरोशे , चंद्रकांत शहा ,बबनराव कदम, विठ्ठलराव राणे यांचे सह प्रकाश पाटील देवसरकर यांचे समर्थक व कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते . या सत्कार सोहळ्याला पाहून दोन्ही खासदार यांनी प्रकाश पाटील देवसरकर यांचे आभार मानले .

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button