HomeकृषीWild Vegetable Festival : अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

Wild Vegetable Festival : अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

नांदेड| प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी व बचतगटांसाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

तरी लाभार्थ्यांनी 11 ते 17 जुलै 2025 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट येथील सेतू सुविधा केंद्रात नोंदणी करावी. तसेच या रानभाजी महोत्सवात जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला यांनी केले आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट जि. नांदेड या कार्यालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण नांदेड जिल्हा आहे. संपूर्ण जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना, महिला बचतगटांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना न्यक्लिअस बजेट योजना सन 2025-26 योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत गट क मधील सामुहिक लाभाच्या योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी स्थानिक परिसरामध्ये उपलब्ध रानभाज्यांचे जिल्हास्तरावर प्रदर्शन व विक्रीसाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन माहे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे.

या रानभाजी महोत्सवात प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट कार्यालयामार्फत स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. सर्व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या रानभाजी महोत्सवात सहभाग घेवून परिसरातील रानभाजीचे विक्री करावयाची आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments