नांदेडमहाराष्ट्र

Mumbai-Nanded flight service : मुंबई–नांदेड विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरू; प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

नांदेड| नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, वाशिमसह संपूर्ण मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई–नांदेड–मुंबई विमानसेवा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत असून, स्टार एअर कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंगला सुरुवात झाली आहे.

या विमानसेवेची सुरुवात यापूर्वी नोव्हेंबरमध्ये करण्याचे नियोजन होते; मात्र तांत्रिक कारणांमुळे ती काही दिवस पुढे ढकलण्यात आली होती.

✈️ आठवड्यात तीन दिवस सेवा – प्राथमिक टप्प्यात ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध राहणार आहे. लवकरच प्रवाशांच्या प्रतिसादानुसार दररोजची विमानसेवा सुरू करण्याची तयारीही कंपनीकडून सुरू आहे.

🛫 विमानसेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न नांदेड–मुंबई हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे. त्यांनी सर्वांचे आभारही व्यक्त केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!