Mumbai-Nanded flight service : मुंबई–नांदेड विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरू; प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
नांदेड| नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, वाशिमसह संपूर्ण मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई–नांदेड–मुंबई विमानसेवा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत असून, स्टार एअर कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंगला सुरुवात झाली आहे.
या विमानसेवेची सुरुवात यापूर्वी नोव्हेंबरमध्ये करण्याचे नियोजन होते; मात्र तांत्रिक कारणांमुळे ती काही दिवस पुढे ढकलण्यात आली होती.
✈️ आठवड्यात तीन दिवस सेवा - प्राथमिक टप्प्यात ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध राहणार आहे. लवकरच प्रवाशांच्या प्रतिसादानुसार दररोजची विमानसेवा सुरू करण्याची तयारीही कंपनीकडून सुरू आहे.
🛫 विमानसेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न नांदेड–मुंबई हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सहकार्य मिळाले अ...
