क्राईमनांदेड

Itwara police action : इतवारा पोलिसांनी दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला -NNL

नांदेड| पोलीस स्टेशन इतवारा यांनी मागील दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपीतांना गजाआड केले आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यानी वजिराबाद पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी “ऑपरेशन फ्लश ऑऊट ” अंतर्गत मागील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीताना अटक करून गुन्हे उघडकिस आणण्याचे आदेश नांदेड जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने दि.04/10/2024 रोजी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन इतवारा येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार पो.स्टे. हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत होते. यावेळी गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की पो.स्टे. देगलूर व रामतीर्थ हददीत चोरी करणारे आरोपी हे भंगार दुकाण भगतसिंग रोड नांदेड येथे असल्याची माहिती मिळाले वरून सदर ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली.

यावेळी त्यांनी त्यांचे नाव 1) शेख अजिज ऊर्फ मौलाना पि. शेख मुस्तफा, वय 42 वर्षे व्यवसाय मजुरी रा. खडकपुरा नांदेड, ह.मु. चंद्रयानगुट्टा पोष्ट ऑफीस जवळ हैद्राबाद, २) शेख आरेफ पि. शेख बाबु वय 30 वर्षे व्यवसाय भंगारदुकाण रा. तुराबनगर देगलूरनाका नांदेड असे सांगुन पो.स्टे. रामतिर्थ गु.र.नं. 243/2024 कलम 303 (2) BNS चे गुन्हयातील 1000 किलो लोखंडी गजाळी किंमती अंदाजे 50,000/- रूपयाची व पो.स्टे. देगलूर गु.र.नं. 441/2024 कलम 331 (4), 305 BNS गुन्हयातील बॅटऱ्या व चार्जीग चेकअप मशिन 35406/- रूपयाचा मुद्देमाल असा एकुन 85406/- रूपयाचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली व सदरचा माल त्यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला.

सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, सुशीलकुमार नायक उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा, नांदेड, यांचे मर्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे पो.स्टे. इतवारा व वरील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. रमेश गायकवाड, ASI देविदास बिसाडे, मिर्झा अख्तर बेग, पोहेकॉ. एकनाथ मोकले, मोहन हाक्के, धिरजकुमार कोमुलवार, पोना, हबीब चाऊस, लक्ष्मण दासरवार, पोकॉ. शेख जावेद, रेवणानथ कोरनुळे, काकासाहेब जगताप, नजरेआजम देशमुख, संघरत्न गायकवाड यांनी पार पाडून चांगली कार्यवाही केली आहे. त्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button