नांदेडक्राईम

Mahur News: दूकान समोर वाहन का लावले म्हणून वाद ; गुन्हा दाखल

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर बस स्थानकासमोरील राधिका लॉज मध्ये आलेल्या ग्राहकाने बाजूच्या दुकाना समोर कार लावली माझ्या दुकानासमोर लावलेली कार काढून घ्या असे म्हणले असता शिवीगाळ करून जबर मारहाण केल्याची घटना दि. रोजी ३१ रोजी घडली लॉज मालकासह ग्राहका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी दिलीप जयस्वाल ह्याचे बस स्थानका समोर जयस्वाल कॉम्प्लेक्स आहे ते दि.३१ जूलै रोजी सकाळी ९.३० वा. चे सुमारास दुकान उघडत असतांना दुकानासमोर एम एच ०४ एफ आर ०४५७ हि चार चाकी पार्किंग केलेली दिसली असता त्यांनी राधिका लाँज व हॉटेल चे मालक प्रभु मेहता यांना मी माझे दुकान उघडत आहे दुकानासमोर लावलेली गाडी काढुन घ्या असे सांगितले.

लॉजवर थांबलेला वैभव भगवान पठाडे राहणार पुसद यांना त्यांची गाडी काढुन घेतली, पण शिवीगाळ करुन धक्काबुकी केली व माझ्या तोंडावर हाताने मारहाण केली. नंतर तुला बघुन घेतो असे, बोलुन वैभव भगवान पठाडे हा तेथुन निघुन गेला. व प्रभू मेहता यांनी माझे ग्राहक इथेच गाड्या लावतील असे म्हणुन शिवीगाळ केली असल्याची तक्रार दिली पुढिल तपास माहूर पोलीस करत आहे.

माहूर शहर देवस्थानाचे ठिकाण असल्याने येथे अनेक लॉजिंग आणि घरगुती लॉजिंग चा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे ,व येथे दररोज खाजगी वाहने येत असून ही वाहने थांबविण्यासाठी एकाही लॉज, गेस्ट हाऊस, मालकाने पार्किंग साठी जागा सोडलेली नसल्याने सर्व वाहने इतर दुकानदारांच्या दुकानासमोर किंवा मुख्य रस्त्यावर थांबत असल्याने माहूर शहरात वाद निर्माण होत असतात.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button