नायगाव बाजार| दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अंतर्गत नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रा. इरवंत सूर्यकार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे.

रयत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सेवेला, कार्याला सुरुवात केली. ग्रामस्वच्छता अभियान, आरोग्य, शिक्षण महिला सक्षमीकरण आणि सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण माझा मागास घटकातील मुला-मुलींना वंचित असलेल्या शिक्षणापासून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम, नांदेड जिल्ह्यात जवळपास 100 गावांमध्ये लोक जैवविविधता च्या माध्यमातून केलेले काम आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा 2009 पासून काम करीत आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये ते समन्वयक म्हणून सुद्धा काम करीत आहेत. मागील उमेद संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उमेदच्या प्रलंबित मागण्याबाबत विविध मोर्चे आंदोलन,उपोषण करून शासनास जाग करण्याचं काम केलेले आहे.

नायगाव तालुक्यातील पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असतात ते म्हणाले उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचारी व कॅडर यांना स्थायी स्वरूपात शासन सेवेमध्ये विनाआट समावेश करून घ्यावं, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवावेत, ते उच्च शिक्षित असून पीएचडी धारक आहेत शासन व्यवस्थेमध्ये सुशिक्षितांचा भर पडत आहे आणि याला तथाकथीत असलेली सत्ताधारी व्यवस्थेची मंडळी हे कारणीभूत आहेत या पोटी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली असे सांगितले.

रोजगारांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, युवतींचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा बॅक लॉग असो, आरक्षणाच्या संदर्भात विविध जातींना दिलेले आश्वासन असो ती पाळली गेली नाहीत म्हणून अशा अनेक प्रश्नांची भडिमार यांच्याकडे ही व्यवस्था कानाडोळा करीत असल्यामुळे आपण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरावं हा मानस करून या निवडणुकीत उतरलेले आहे .
