Cow Calf Birthday ; लोह्यात भोस्कर कुटुंबीयांकडून गोमातेच्या वासराचे बारसे भोस्कर कुटूंबियांनी दिला गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश

लोहा। भारतीय हिंदू संस्कृतीत गोमाता व गोमातेचे दूध गोमूत्र शेण यांना अन्यन महत्व आहे. मोठ्या आस्थेने गो मातेची पूजा केली जात असते म्हणून गोमातेचे रक्षण पालन पोषणाला फार महत्व आहे पुढील काळात या गोमातेचे रक्षण जतन करण्यासाठी भोस्कर कुटूंबियांनी गोमातेच्या वासराचे बारसे अर्थात नामकरण करून गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे
हिंदू धर्मांत बारसे अर्थातच नामकरण सोहळा हा अतिशय महत्वाचा विधी मानला जातो.

कुटूंबात जन्मलेल्या बाळाचे नामकरण अर्थात बारसे आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु पशु पक्षी यांचे नामकरण किंवा बारसे कोणीही करीत नाही. पण लोह्यातील देऊळगल्लीतील भोस्कर कुटूंबियांनी हिंदू धर्मातील रीतिरिवाज प्रमाणे गोमातेचे बारसे नामकरण करून जनतेसमोर गोमातेचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे गायीच्या अर्थातच गोमातेच्या वासराचे बारसे हा कार्यक्रम संबंध भारतीय संस्कृतीत आदर्शदायी उदाहरण ठरनार आहे.

गोमातेला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान असून गोमातेच्या वासराचे बारसे लोहा शहरातील देऊळगल्ली भागात भोस्कर दांपत्य वा कुटुंबीयांनी गल्लीतील सर्व जाती धर्मातील महिलांना निमंत्रित करून विधिवत पोशाख धारण करून हिंदू धर्म पद्धतीने मंत्रोच्चारात,विधिवत कलश पुजन,विविध रत्नजडीत अलंकार, नमूनेदार खवय्यांनी बनवलेला नैवेद्य अतिशय उत्कृष्ट रित्या मांडून ,मनोभावे पुजा अर्चा पाठ करून शुभ मुहूर्तावर विधीयुक्त मंत्रोच्चारात गोमातेचे वासराचे नामकरण बारसे विधी कार्यक्रम केला.

गोमातेबद्दल आदरभाव असलेले भोस्कर कुटुंबीय यांनी सर्व समाजातील, धर्मातील महिलाच्या उपस्थितीत गोमातेच्या बद्दल चा आदरभाव, सेवाभाव, आध्यात्मिक महत्व,तिचे रक्षण, गोमातेची फायदे यात गाईचे दुध, गोमूत्र,शेण या सर्व बाबींतून सात्विकतेचे, धार्मिकतेचे विशेष महत्त्व असल्याने जणू भारतीय संस्कृतीत प्रेरणादायी उदाहरण म्हणून अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने विविध गीतांचे गायन करून, पुजन करून तेहतीस कोटी देवांच्या दर्शनाचा महान योग या शुभमुहूर्तावर आला असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले.

यावेळी सविता भोस्कर माजी नगरसेविका गोदावरीताई सूर्यवंशी सौ भिकुताई रहाटकर सौ संगीता चन्नावार सौ भाग्यश्री रेखावार इंदुताई रहाटकर सुनंदा रहाटकर उमां राहटकर संगीता चालिकवार ज्योती आंबेकर वैशाली भातलवंडे पल्लवी बिडवई बालीताई बंडेवार शिल्पा बच्चेवार लता किटे सुनंदा बच्चेवार ज्योती पेटगुलवार आरती भोस्कर प्रिया रुद्रवार सुनीता रहाटकर शोभा अमिलकंठवार निर्मला काचावार राधिका पाथरकर आदींची उपस्थिती होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button