नांदेडधार्मिकव्हिडीओ

darshan of Maroti Raya of Borgadi : विदर्भ- मराठवाडा – तेलंगणा राज्यातील हजारो भक्तांनि घेतले बोरगडीच्या मारोतीरायाचे दर्शन

हिमायतनगर,अनिल मादसवार| चैत्र शुद्ध नवमी दि.12 एप्रिल शनिवारी आलेल्या हनुमान जयंती निमित्ताने विदर्भ – तेलंगाना – मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्या बोरगडी येथील मारोती मंदिरात संकटमोचन श्री हनुमंत रायाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जय हनुमान.. जय श्रीराम…. बजरंग बली की जय… पवनसुत हनुमान की जय.. च्या जयघोषात भाविकांनी नारळ फोडुन श्रीचे दर्शन घेतले. तळपत्या उन्हात देखील मंदिर परिसरात नवसाला पावणाऱ्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी सकाळी 4 वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले आहे.

प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री बजरंगबली हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा तथा मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो…..असे जुन्या जनकारातून सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंगबली मुर्तीची प्रतीष्ठापना करुन मारोतीरायाचे मंदीर गावाच्या सुरक्षेच्या हेतुने उभारलेले असते. या दिवशी हनुमंत रायाला प्रीय असलेली रुचकीच्या पाने – फुलांची पुष्पमाला, दस्ती टोपी, फेटा अर्पण करुन सर्व संकट, दुखः दुर करण्याची मनोकामना भक्त करतात. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी बोरगडी येथील मारोती मंदिरात ३० हजाराहून अधिक भाविकांनी मारोतीरायाचे दर्शन घेऊन मनोकामना केली आहे. यावेळी दानशुर दात्याच्या सहकार्याने दर्शनार्थी भक्तांना महाप्रसादाचे वितरण तसेच थंड पेयजल वितरित करण्यात आले.

मनोकामना पूर्ण झालेल्या भाविक दूरदूरवरून मोठ्या संख्येने सहपरिवारसह दर्शनासाठी दाखल झाले होते. ज्यांचा नवस आहे असे भाविक हिमायतनगर शहरापासून तळपत्या उन्हात पैदल चालत येऊन हनुमंतरायाचे दर्शन घेत आपला नवस फेडताना पाहावयास मिळाले आहे. हनुमान जन्मोत्सव निमित्ताने भरविण्यात आलेल्या यात्रा उत्सवात खेळणी साहीत्यासह सौंदर्य प्रसाधनाची दुकाने, खवय्यांसाठी, हॉटेल, जिलेबी यासह सर्व प्रकारच्या साहित्याच्या दुकानाने यात्रा फुलली होती.

दि.12 शनिवारी संकटमोचन, दुखःनिवारक श्री बजरंगबलीचा जन्मोत्सव चैत्र पोर्णीमेच्या दिवशी मोठ्या हर्षोल्हास व मंगलमय वातावरणात हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील मारोती मंदिरात पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंगलमय मंत्रोच्चारात आणि हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मध्यरात्री ०४ वाजल्यापासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे. दि.13 रविवारी सकाळी 10 वाजता बोरगडी येथील हनुमान मंदिरात काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर दुपारी ०२ वाजता कुस्त्यांची दंगलीचे उद्घाटन होणार असुन, कुस्तीत विजेत्या मल्लाना बक्षीसे प्रदान करुन गौरवीण्यात येणार आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यातील तमाम कुस्ती शौकीन व मल्लांनी हजेरी लाऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन मारोती मंदिर कमेटी आणि गांवकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुक्यातील मौजे सातशीव वटफळी येथील हनुमान मंदिरासह हिमायतनगर शहरातील पवनसुत हनुमान मंदिर, पोलीस ठाण्याजवळील दक्षीन मुखी हनुमान मंदिर, रुख्मिणी नगर परिसरातील हनुमान मंदिर, पळसपुर हनुमान मंदिर, सवना ज, दरेसरसम, सरसम बु, मंगरुळ, वडगांव ज, आंदेगाव, कार्ला पी., पोटा बु, सिबदरा, सिरंजणी, एकंबा, पवना, टेंभी, डोल्हारी, सिरंजणी यासह अन्य छोट्या मोट्या गावात रामभक्त श्री हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जवळपास सर्वच मंदिरात भजन – किर्तन, महाप्रसादाच्या पंगती करण्यात आल्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मारोतीरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी लागणारे नारळ, बेलफुल, पेढा, साखरेचा पेढा आदीचे भाव गगनाला भीडल्याने भक्तांना महागाईचा फटका सहन करावा सहन लागला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button