darshan of Maroti Raya of Borgadi : विदर्भ- मराठवाडा – तेलंगणा राज्यातील हजारो भक्तांनि घेतले बोरगडीच्या मारोतीरायाचे दर्शन
हिमायतनगर,अनिल मादसवार| चैत्र शुद्ध नवमी दि.12 एप्रिल शनिवारी आलेल्या हनुमान जयंती निमित्ताने विदर्भ - तेलंगाना - मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्या बोरगडी येथील मारोती मंदिरात संकटमोचन श्री हनुमंत रायाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जय हनुमान.. जय श्रीराम.... बजरंग बली की जय... पवनसुत हनुमान की जय.. च्या जयघोषात भाविकांनी नारळ फोडुन श्रीचे दर्शन घेतले. तळपत्या उन्हात देखील मंदिर परिसरात नवसाला पावणाऱ्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी सकाळी 4 वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले आहे.
प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री बजरंगबली हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा तथा मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो.....असे जुन्या जनकारातून सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंगबली मुर्तीची प्रतीष्ठापना...
