नांदेडधार्मिक

Datta janmotsav ; वाई बाजार येथे दत्त नामाच्या जयघोषात व पुष्पवृष्टी करत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा -NNL

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील वाई बाजार येथे श्री दत्त जन्मउत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते.या ही वर्षी दत्तजयंती निमित्ताने भाविकांच्या उपस्थितीत दत्त नामाच्या जयघोषात व पुष्पवृष्टी करत दुपारी १ वाजता येथील हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

IMG 20241215 185319 Datta janmotsav ; वाई बाजार येथे दत्त नामाच्या जयघोषात व पुष्पवृष्टी करत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा -NNL

येथील श्री दत्त मंदीराच्या भव्य दिव्य सभामंडपात भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी १० वाजतापासून दिगंबरा… दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा..’ चा जयघोष करत आकर्षक फुलांनी सजवलेल्या, मंदीरात दत्त जन्म सोहळा फुलांची उधळण करत साजरा करण्यात आला.

IMG 20241215 WA0010 Datta janmotsav ; वाई बाजार येथे दत्त नामाच्या जयघोषात व पुष्पवृष्टी करत श्रीदत्त जन्मोत्सव साजरा -NNL

या प्रसंगी दिंगाबर गोस्वामी सर व उत्तमनाथ जाधव महाराज यांनी श्री दत्तप्रभुच्या मुर्तीचे पुजन,अभिषेक व ग्रंथाच्या वाचनासह विविध धार्मिक विधी पार पाडले. यावेळी हजारो महिला भाविकांची उपस्थिती होती. यानंतर दु .१ : १५ मि.श्री दत्त प्रभुच्या पाळण्याची दोर हातात धरुण दत्त जन्म पाळणागीत गावून आरती करण्यात आली व लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली.यावेळी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता.साय.६ वा नित्यनेमाणे होणारी श्री दत्त प्रभुची आरती करण्यात आली व राञी १० वाजता पासून सोळस महापुजेला सुरुवात करण्यात आली होती.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!