हिमायतनगर, पळसपूर, सिरपल्ली अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाश्यांची हेळसांड – रस्त्याचे काम वेगाने पुर्ण करा -NNL

हिमायतनगर,दत्ता शिराणे। हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या तिन वर्षांपासून अतिशय कासव गतीने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडून हे काम म्हणायला सुरू आहे. परंतू कामाला कुठलीच गती नसल्याने काम थांबूनच आहे. रस्ता फक्त खोदकाम करून ठेवला असल्यानै प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत आहे. या अंतर्गत रस्त्याचे काम दर्जात्मक पद्धतीने वेगाने पुर्ण करूण प्रवाश्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात पतंगे यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मुख्य मंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या कामाला जवळपास तिन वर्षापुर्वी मंजूरी मिळाली. तेव्हापासून या कामाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर येथील सिद्दीकी नामक ठेकेदारास हे काम देण्यात आलेले आहे. सदरचे काम या गेल्या तिन वर्षांपासून अतिशय कासव गतीने चालू आहे.

परंतु कामाला कुठलीच गती नाही. हा रस्ता फक्त खोदकाम करून ठेवला असल्याने या अंतर्गत रस्त्यावर प्रचंड चिखल निर्माण झाला असून चिखला मुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या अंतर्गत रस्त्यावरील कामाची दयनीय अवस्था लक्षात घेता, या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी वेळीच लक्ष पुरवून काम वेगाने पुर्ण करूण प्रवाश्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे यांनी केली असून, काम वेगाने पुर्ण नाही झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा ही सुनील पतंगे यांनी दिला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button