हिमायतनगर, पळसपूर, सिरपल्ली अंतर्गत रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाश्यांची हेळसांड – रस्त्याचे काम वेगाने पुर्ण करा -NNL
हिमायतनगर,दत्ता शिराणे। हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याचे काम गेल्या तिन वर्षांपासून अतिशय कासव गतीने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराकडून हे काम म्हणायला सुरू आहे. परंतू कामाला कुठलीच गती नसल्याने काम थांबूनच आहे. रस्ता फक्त खोदकाम करून ठेवला असल्यानै प्रवाश्यांची मोठ्याप्रमाणात हेळसांड होत आहे. या अंतर्गत रस्त्याचे काम दर्जात्मक पद्धतीने वेगाने पुर्ण करूण प्रवाश्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुनील पतंगे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात पतंगे यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मुख्य मंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या कामाला जवळपास तिन वर्षापुर्वी मंजूरी मिळाली. ...
