Laxman Hake ; नांदेड दक्षिण मध्ये ओबीसी नेते लक्षमण हाके आयलवाड यांच्या निवासस्थानी मुक्काम, आगामी विधानसभा सह अनेक विषयावर चर्चा – NNL

नवीन नांदेड| ओबीसी नेते लक्षमण हाके यांनी भोकर येथील जाहीर सभा झाल्यानंतर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सिडको परिसरातील मोढा प्रकल्प अंतर्गत असलेल्या नामदेव रायलवाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदाधिकारी सह कार्यकर्ते यांच्याशी आगामी विधानसभा व आगामी अनेक विषयावर चर्चा केली. रात्री मुक्काम केला, यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.

राज्यात ओबीसी नेते लक्षमण हाके यांनी मराठा आरक्षण स्वतंत्र दयावे यासाठी अमरण ऊषोषण केले होते यानंतर राज्यातील अनेक भागामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, यानंतर प्रथमच मराठवाडयात नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समन्वयक नेते नामदेवराव आयलवाड यांच्या प्रत्यानातुन मराठवाड्यात प्रथम नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात १८ आगस्ट रोजी लक्षमण हाके यांच्यी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, रात्री उशिरा सभा संपल्यानंतर उशिरा सिडको येथील नामदेव आयलवाड यांच्या निवासस्थानी आगमन झाले यावेळी ऊत्साहात ग्रामीण शहरी भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून केलेले स्वागत चर्चा विषय ठरला.

यावेळी ब्रिजलाल ऊगवे, जगन्नाथ आयलवाड, संदीप जिल्हेवाड, सुदर्शन काचंनगिरे, पिंटु महाराज, ज्ञानेश्वर कोणंके,श्रीरंग बिगेंवाड, ऋषी मैड, प्रमोद मैड, यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निवासस्थानी स्वागत केले, यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार यासह वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली व रात्रीच्या मुक्काम आयलवाड यांच्या निवासस्थानी केल्याने पोलीस यंत्रणा सह अनेक पदाधिकारी, व कार्यकर्ते यांच्यी धावपळ झाली, सकाळी हाके हे लातूर फाटा मार्ग पंढरपूर कडे ताफ्यासह रवाना झाले.अचानक केलेला मुक्काम व भोकर येथे घेण्यात आलेली जाहीर सभा हा विषय मात्र चर्चा करून गेला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button