नांदेड

of the Legislative Assembly | नव्या उमेदिच्या उमेदवाराला लागली विधानसभेची चाहूल.. NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात नव्या उमेदीने आमदारकीचे स्वप्न पाहणारे सचिन नाईक यांनी किनवट माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील भिंती फलक यासह शासकीय मालमत्तेच्या राज्य रस्ता महामार्गावर असलेल्या दिशा दर्शक फलकावर सुद्धा रंगरंगोटीच्या माध्यमातून अतिक्रमण केल्याने आत्ताच या नवीन उमेदवारांनी शासकीय मालमत्तेवर ताबा मिळवल्या ची खमंग चर्चा तालूकाभरातून ऐकावयास मिळत आहे.

ग्रामीण भागातील मुख्य राज्य रस्त्यावर प्रवाशासाठी दाखवल्या जाणाऱी गावाच्या नावाची ओळख दाखवणाऱ्या दिशा फलकावर सचिन नाईक मित्र मंडळाचे बॅनर दोन्ही तालुक्यातून झळकत असल्याने दिशा फलक ही बाजूला गेली सचिन नाईक मित्र मंडळाची चर्चा गलो गल्ली रंगू लागली. या सर्व बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून गप्प का ?असा सवाल आता जनसामान्यातून पुढे येत आहे?

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तरुण व नव्या उमेदिचे नवीन उमेदवार म्हणून सचिन नाईक यांच्याकडे बघितले जाते पण सचिन नाईक मित्र मंडळाच्या रंगरंगोटीने आता तालुका चर्चेत आला असून सचिन नाईक हे कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार हे अद्याप पर्यंत निश्चित नसताना सचिन नाईक मित्र मंडळाची स्थापना हे खेड्यापाड्यात झाल्याची पहावयास मिळते.

IMG 20240715 WA0055 of the Legislative Assembly | नव्या उमेदिच्या उमेदवाराला लागली विधानसभेची चाहूल.. NNL

त्यातच निवडणुकीच्या अगोदरचा गाजावाजा म्हणून गावोगावी वॉल पेंटिंग करणे त्यामध्ये शाळेची सुरक्षा भिंत, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संरक्षण भिंती, रेल्वे विभागाची पूल, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे गावाचे नाव दर्शविणारे दिशाफलक व पर्यटन स्थळांच्या जागा व जंगलातील रोड लगत असलेले मोठे दगड सचिन नाईक मित्र मंडळाच्या फलकाने ताबा मिळवला हा सचिन नाईकाचा प्रचार म्हणावा का..? शासकीय मालमत्तेवरील ताबा म्हणावा हा प्रश्न आता या मतदारसंघातील सुज्ञ नागरिकांना पडणे सहाजीकच आहे?

एकीकडे सचिन नाईक यांचे नात्यांनी लागणारे काका माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यात सुद्धा पोस्टर ने भिंती रंगू लागल्या चे चित्र किनवट माहूर मतदारसंघात पहावयास मिळत असल्याने जणू काका पुतण्याची स्पर्धा लागली की काय..? अशाही चर्चा आता रंगू लागल्या ? शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केलेल्या या रंगरंगोटी विरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग काय पावले उचलणार याकडे या मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!