Homeनांदेडblood donation camp ; स्टेट बँक ऑफ इंडियाच्या औद्योगिक वसाहत शाखा शिवाजीनगर...

blood donation camp ; स्टेट बँक ऑफ इंडियाच्या औद्योगिक वसाहत शाखा शिवाजीनगर शाखेत भव्य रक्तदान शिबिर

नांदेड l एसबीआय नांदेड विभागीय कार्यालय ,क्षेत्रीय कार्यालय आणि शिवाजीनगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एस बी आय शिवाजीनगर शाखा नांदेड इथे बँकेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात एसबीआय नांदेड विभागीय कार्यालयाचे उपमहा प्रबंधक श्री वाय व्ही एस एस नागेश्वर राव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक सुरज यामयार, प्रादेशिक व्यवसाय कार्यालयाचे सहाय्यक महाप्रबंधक, श्री महेश्वर सिंग , शिवाजीनगर शाखेचे मुख्य प्रबंधक, अतुल चव्हाण शाखा उप प्रबंधक गणेश गुडसुरकर एसबीआय स्टाफ युनियनचे राहुल खेडकर सेवा संघटनेच्या डीजीएस शिल्पा जिंतूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी धर्मदाय कार्यालयातील न्यायाधीश श्रीमती ममता राखाडे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राहकानी रक्तदान केले. रक्त संकलनाचे काम नंदिग्राम ब्लड बँकेचे डॉक्टर आळणे आणि त्यांच्या टीमने यशस्वी पार पाडले. यावेळी 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी पांडे आणि रवी मामुलवार यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments