नांदेडक्राईम

Nanded Crime News : लग्नाचे आमिष देत ‘महाराजा’चा घाणेरडा प्रकार; नांदेडमध्ये खळबळ

नांदेड| राज्यभर चर्चेत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्येही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मठातील एका तथाकथित महाराजाने लग्नाचे आमिष दाखवत ४७ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संत हरीगीर दत्तगीर गिरी (वय ३८) असे आहे. तो नांदेड शहरातील गाडीपुरा परिसरातील एका मठाचा प्रमुख असून, धार्मिक कार्यक्रमांमुळे त्याच्याकडे भाविकांची मोठी वर्दळ असते.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मे २०२५ मध्ये मठात दर्शनासाठी गेली असता आरोपीशी तिची ओळख झाली. त्यानंतर मोबाईलवरून संपर्क वाढवत आरोपीने तिला विश्वासात घेतले. पुढे लग्नाचे आमिष दाखवत तिच्या घरी जाऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

याशिवाय, लग्नाबाबत विचारणा केल्यावर “मी संन्यासी आहे, लग्न करू शकत नाही” असे सांगत प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची ऑफर देत धमकी दिल्याचाही आरोप आहे.

IMG 20260322 WA0054 scaled Nanded Crime News : लग्नाचे आमिष देत ‘महाराजा’चा घाणेरडा प्रकार; नांदेडमध्ये खळबळ

या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. धर्माच्या आडून फसवणूक व अत्याचार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. विश्वासाचा गैरवापर करून गुन्हे करणाऱ्यांना आता कायद्याचा चाप बसणार का?

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!