नांदेडआरोग्य

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

नांदेड l जिल्हा मध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी आरोग्य सेवा ग्रामीण भागातील जन सामान्य गरजू लोकांना पर्यंत पोहचावी यासाठी त्यांनी रुजू झाले तेव्हा पासून जिल्हातील सर्व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र यांना भेटी आढावा बैठक घेऊन नियोजन केले. त्यामुळे राज्य स्तरावर जिल्हाला अनेक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

दि. २२ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान २०२६ सोहळा महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे वतीने मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थिती आरोग्य राज्य मंत्री नामदार मेघना ताई साकोरे -बोर्डिंकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट आरोग्य सेवा मध्ये काम केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

IMG 20260301 WA0001 आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

या मध्ये नांदेड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ मोहनी सुर्यवंशी, प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा ता. हदगांव , औषध निर्माण अधिकारी आडे प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम बु व आशा स्वयंसेविका पुरस्कारार्थी श्रीमती रिना अशोक पवार उपकेंद्र लहान मौजे चेनापूरतांडा प्राथमिक आरोग्य केंद्र येळेगाव ता. अर्धापूर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे मा. आरोग्य मंत्री नामदार श्री प्रकाशजी आबिटकर, नामदार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व उपस्थित आयुक्त कादंबरी बलकवडे, आरोग्य सचिव ई रविंद्रन आरोग्य विभाग संचालक डॉ नितीन अंबाडेकर, डॉ विजय कंदेवाड यांच्या हस्ते सन्मानचिह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्विकारताना सोबत नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांचा गौरव करण्यात आला.

या बाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता जिल्हा मध्ये आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहचली पाहिजे या साठी मी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, लातूर आरोग्य उपसंचालक डॉ रेखा गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील माझी आरोग्य सेवा मधील जिल्हा स्तरावरून गाव पातळीवरील सर्व यंत्रणा यांच्या सहकार्याने मी काम करुन जिल्हाला अनेक पुरस्कार या वर्षी सुध्दा यांच्यामुळे मिळाले असल्याचे प्रतिपादन केले आहे.

या मुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांच्यामुळे जिल्हा राज्यात आरोग्याच्या विविध योजना व आरोग्य सेवा देण्यामध्ये अव्वल स्थानावर नेला आहे या बद्दल त्याच्या कामाचे कौतुक अनेक पदाधिकारी व अधिकारी याचा कडून होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!