नांदेडदेश विदेशधार्मिक

A special train will run from Nanded : 22 जानेवारी 2025 रोजी नांदेडहून महाकुंभ मेळाला विशेष रेल्वे जाणार -NNL

नांदेड| प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील कुंभ मेळाला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड विशेष रेल्वे प्रयागराज चौकी आणि काचीगुड-पटणा-काचीगुडा नांदेड आणि प्रयागराज चौकी मार्गे चालविण्यात येत आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07722 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.

गाडी क्रमांक 07725 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 16:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07726 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे सकाळी 07:00 वाजता पोहोचेल. या गाडीत 20 डब्बे असतील असेही सांगण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!