हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यात निसर्गनिर्मित काही डोंगरचे अवैध उत्खनन केले जात असल्याने सुंदरतेने नटलेल्या डोंगराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. डोगराच्या होणाऱ्या उत्खननामुळे पर्यारणाच्या धोका निर्माण झाला असून, ज्या दिवशी प्रशासकीय सुट्या असतात त्या दिवशी माञ गौणखनिज चोरट्या करिता सुवर्ण संधीचाच दिवस आहे की काय..? असे वाटते. कारण त्या दिवशी गौणखनिजची ट्रक्टर, टिप्पर, हायवा वाहने भरधाव वेगाने जात आसतात. या जाणाऱ्या वाहनेकडे कुणाकडे गौण खनिजची रॉयल्टी आहे की..? नाही या बाबतीत हदगांव तहसिल कार्यालयाच्या गोण खनिज विभागाकडे तपासणी करिता यंत्रणा कार्यन्वीत आहे की..? नाही असा पण प्रश्न निर्माण होत आहे.
याबाबत संबधीत विभागाकडे मनाठा व हदगाव परिसरातील काही नागरिकानी लिखित स्वरुपात तक्रारी केलेल्या आहेत. वृतमानपञात ही अनेक बातम्या येत असतांना ही तहसिल कार्यालयाच गौण खनिज विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने परिणाम स्वरूप गौण खनिज चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून येत येत आहेत. हदगांव तालुक्यात अनेक निसर्गनिर्मित माळरान डोंगर असून, जिकडे पाहावे तिकडे टेकड्याच नैसर्गिक सौंदर्य असल्याचे चित्र हे काही वर्षां पूर्वी दिसत होते.
विकासाच्या नावाखाली येथील नैसर्गिक संपत्ती व्यर्थ जात आहे. दळणवळणाच्या साधनांनी क्रांती केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते बांधकाम व रस्त्याच्या डागडुजीचे काम होत आहे. काही कामात मुरुम दगड व अन्य साहित्य डोंगराचे खोदकाम करून वापरले जाते. यावेळी निसर्ग निर्मित डोंगर यंत्राच्या साहाय्याने पोखरून खनिज संपत्ती काढली जाते. त्यामुळे माळरानाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
ग्लोबल वॉर्मिंगची समस्या
काही कारणास्तव निसर्गाच्या नियमात बदल होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या पुढे येत आहेत. निसर्ग निर्मित माळरानाचे संवर्धन करणे, पर्यावरणाचा समतोल ठेवणे, आजच्या आधुनिक युगात गरजेचे आहे. अस पर्यायवरण प्रेमीच म्हणने आहे माळरानावरील वृक्ष तोडी सोबतच गौण खनिजच उत्खनन होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे डोंगरावरिल अवैध उत्खनन थांबविणे गरजेचे आहे. टेकड्यावरील वनसंपत्ती ही नष्ट होत आहे. टेकड्यांवरील वृक्षतोड तर होतेच, त्याचप्रमाणे माळराना वरील असणाऱ्या पाळीव व वन्य प्राण्यांचा चारा ही नष्ट होत आहे.
हदगाव तालुक्यात वनपरिक्षेञ कार्यालयच हदगाव शहरातुन एका गावाच्या टेकडीच्या पायथ्याशी नवीन कार्यालय कोट्यावधी रुपायाची ईमारत बाधण्यात आलेली आहे. जर ऐखाद्या डोंगरातील गौणखनिज चोरी च्या बाबतीत गोपनिय सुचना दयायची झाल्यास शहरातुन तीन किमी असलेल्या कार्यालयात दयावी लागणार आहे. यामुळे नेमकी शहरातुन दुर बाधलेल्या या वनपलीक्षेञ कार्यालयाचा उपयोग कुणाला होणार आहे. परिणामी वन्यप्राण्यांची गावाकडे वाटचाल सुरू असल्याने वन्य प्राण्यांच्या शिकार होण्याचा धोका पण निर्माण झालेल आहे.
गौण खनिज विभाग बेखबर…!
नव्यानेच रुजू झालेल्या तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या कडून पर्यावरण बाबतीत पर्यावरण प्रेमींना फार अपेक्षा आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजच उत्खनन होत असताना मात्र हादगाव तहसील कार्यालयचा गौण खनिज विभाग बेखबर असल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत तहसीलदार यांनी विशेष लक्ष दयाव अशी अपेक्षा तालुक्यातील पर्यावरणप्रेमी करत असताना दिसून येत आहेत.