Nandini Wadekar : पळसपुर येथील नंदीणी वाडेकर चे दहावी परिक्षेत 90 टक्के गुण घेऊन घवघवीत यश

हिमायतनगर| शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी कु.नंदीणी मारोती वाडेकर हिने दहावी परिक्षेत 90.20 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले असुन तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयातुन विद्यार्थिनी पैकी चौदावी तर मागासवर्गीयातुन तालुक्यातुन द्वितीय क्रमांक कु.नंदीणी मारोती वाडेकर हिने पटकावला आहे.ग्रामीण भागातील पळसपुर येथून शाळेला हजेरी लावत अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यामुळे तिने यश संपादन केले असल्याचे सांगितले असुन माझ्या यशाचे श्रेय हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक रणखांब व शिक्षकवृंद यांना दिले आहे.

तिच्या यशाबद्दल हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयाच्या अध्यक्ष माजी मंत्री सुर्यकांता पाटील, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर,सभापती परमेश्वर गोपतवाड, सुभाष दारवंडे, प्रकाश जैन, अनिल मादसवार, अशोक आनगुलवार, दत्ता शिराणे, सोपान बोंपीलवार, प्रा.सुनिल पाटील पतंगे, पोलिस पाटील शंकर वानखेडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पि.आर.वाडेकर, संदीप हरडपकर, यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button