Municipal CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत मालमत्ता करापोटी दोन दुकाने जप्त

नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत मालमत्ता करापोटी दोन दुकाने जप्त करण्यात आली असून थकबाकी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरून मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आयुक्त डॉ .महेश कुमार डोईफोडे , अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम , उप आयुक्त श्री अजितपाल सिंग संधू , सहाय्यक आयुक्त (कर) यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय कार्यालय-6 सिडको अंतर्गत सहायक आयुक्त डॉ. मिर्झा फरहतूऊल्ला बेग यांच्या अधिनस्त वसुल पथक क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 06 अंतर्गत वसुली वार्ड 11-2 पिन नंबर 4051001317 या मालमत्ता धारकाकडे एकूण मालमत्ता कर 87914/व विशेष पाणीकर रुपये47668 /असे एकूण रुपये 135582/येणे होते.

त्यांच्याकडे वसुलीसाठी गेलो असता त्यांनी मालमत्ता कर भरण्यास तयार नसल्यामुळे त्यांचे दुकान सील करण्यात आले आहे.संजय नागापूरकर वसुली प्रवेशक वसंत कल्याणकर ,मारुती सारंग वसुली प्रवेशक मालू एनफळे वसुली लिपीक यांनी कार्यवाही केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button