उस्माननगर| तालुका कृषि अधिकारी कंधार अंतर्गत आणि कृषी सहायक अधिकारी यांच्या संयुक्तपणे मौजे उस्माननगर ता.कंधार येथे वनराई बंधारा सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या शेतातील नाल्यावर वनराई बंधारा उभारण्यात आला.
वनराई बंधारा कामासाठी गावातील लोकांचा लोकसभाग घेण्यात आला. त्यासाठी गावातील सरपंच प्रतिनिधी शेषेराव व्यंकटराव काळम, नवनाथ श्रीराम काळम, सदाशिव भाऊराव घोरबांड रवि बाबाराव ढाले ,कृषि सहाय्पक एस .डी. उबाळे यांनी परिश्रम करुन पाण्याच्पा वाहात्या नाल्यावर शिमिटच्या रिकाम्या बँग मध्ये रेती भरून वनराई बंधारा उभारला.
त्यामुळे पाणी अडवूण त्या पाण्याचा उपयोग रब्बी पिकासाठी व जनावरासाठी होईल असे मत सदाशीव घोरबांड यांनी व्यक्त केले व महाराष्ट्र शासन कृषि विभाग तालुका कृषि कार्यालय यांच्या कडून सामाजिक उपक्रम कार्याचे कौतुक केले आहे.