नांदेडराजकीय

Kha. Ashokrao Chavan : शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजाराच्या मदतीचे वितरण सुरू!: खा. अशोकराव चव्हाण

नांदेड| यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते घेण्यासाठी ३ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी १० हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदतीचे वितरण सुरु झाल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.

सोशल मीडियावरून ही माहिती देताना त्यांनी सांगितले की, रब्बी हंगामासाठी मदत म्हणून नांदेड जिल्ह्याला ७२७.९३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. ही मदत कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामात भाजप महायुती सरकारने एकूण १४०४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पिकांच्या नुकसानीपोटी सप्टेंबरमध्ये नांदेड जिल्ह्याला ५५३.४९ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्या निधीपैकी सुमारे ८५ टक्के निधीचे वितरण यापूर्वीच पूर्ण झाले आहे, अशीही माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!