Car falls off bridge : पुलावरून कार कोसळून एक ठार ! दोन गंभीर

कंधार, सचिन मोरे|  कंधार तालुक्यातील वहाद येथे कार पुलावरून कोसळून एक ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून गंभीर जखमींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

तालुक्यातील वहाद येथे शनिवार सकाळी पहाटे च्या सुमारास गंगाखेड तालुक्यातील अकोली येथून गाडी क्रमांक एमएच ४४ एस ७६९० ने कंधार – कुरुळा मार्गाने वहाद येथून जात असताना पातळी नदीच्या पुलावरून कार खाली कोसळून त्यात चालक जागेच मृत्यू पावल्याची घटना घडली असून यात गंभीर जखमी असलेल्या दोघांना पुढील उपचारासाठी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरे यांनी माध्यमांशी दिली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील अकोली येथील तिघे जण चंद्रकांत सटवाराम देवकते वय 26, पांडुरंग सोपान पोले वय 30 वर्ष, आकाश खंदारे वय 35 वर्ष राहणार अकोली तालुका गंगाखेड येथून काही खाजगी कामानिमित्त कंधार तालुक्यातील कुरळा परिसरात आले होते.

आपले खाजगी काम आटोपून वहाद मार्गे जात असताना वहाद येथील पातळी नदीच्या पुलावरून गाडी कोसळल्याने झालेल्या जबर अपघातात चंद्रकांत सखाराम देवकते हा जागीच ठार झाला.तर सोबतचे दोन सहकारी हे गंभीर जखमी होऊन नदीपात्रात पडले होते. सकाळी परिसरातील शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती कळताच या गंभीर जखमींना तात्काळ कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या जखमीवर डॉ. आकाश रत्नपारखे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील गुरुगोविंद सिंह रुग्णालय विष्णुपुरी येथे पाठवण्यात आल्याची माहिती डॉ. कुरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली. यातील मयत चंद्रकांत देवकते यांचे शवविच्छेतन ग्रामीण रुग्णालय कंधार येथे डॉ. शहाजी कुरे यांनी करून हा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. सदरील वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी अदापही कोणताही गुन्ह्याची नोंद झाली नसल्याची माहिती माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांनी दिली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button